जादा आमिषाने फसवणूक केलेल्या ए.एस.ट्रेडर्सच्या एंजटाची महागडी कार जप्त.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- ए.एस.ट्रेडर्सच्या संचालकांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून केल्या प्रकरणी ए.एस.ट्रेडर्स कंपनीचा एंजट अमित अरुण शिंदे (वय 47.रा.लिंशा हॉटेल जवळ शाहुपुरी) याची 60 लाख रुपये किमंतीची महागडी कार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने पुण्यातून जप्त केली आहे.

अमित शिंदे याला 2023 मध्ये फसवणूकीच्या गुन्हयांत अटक झाली असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहे .त्यांची पत्नी आर्या शिंदे यांच्या नावे असलेली महागडी कार पुणे येथील कोथरुड येथे असलेल्या एका शोरुम कंपनीत कार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला समजताच या पथकातील पोलिसांनी कार जप्त केली.

यातील संशयीताना अटक करून त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.ही महागडी कार पुणे येथे शोरुम कंपनीत असल्याची माहिती काहीनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिली होती.

पोलिस हवालदार राजू येडगे,राजेंद्र वरंडेकर आणि विजय काळे यांनी कार जप्त करून आणली.

Post a Comment

Previous Post Next Post