कोल्हापुरकर संतप्त कोल्हापुरी चप्पल चा प्रसाद दिल्या शिवाय गप्प बसणार नाही, कोलटकर हे काय सरकारी जावाई आहे का ?
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
कोल्हापूर दि. :- इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. कोरटकर हे मागील एक महिन्या पासून पोलीसांना गुंगारा देत होता. आज मंगळवारी दि. २५ रोजी कोरटकरला कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने एक महीना पोलीसांना गुंगारा देत फिरत असलेल्या कोरटकर याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमा झाले होते. ते चांगलेच आक्रमक दिसत होते. पोलिस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, नागरिकांनी त्याला कोल्हापुरीचा प्रसाद दिल्याशिवाय गप्प राहणार नाही संतप्त नागरिकांचे रुद्र अवतार बघून अखेर पोलिसांनी त्याला मागच्या दाराने न्यायालयात हजर केले.
सुनावणीदरम्यान, आरोपी प्रशांत कोरटकरने त्याच्या मोबाईलमधील डाटा डिलीट का केला आहे? आरोपी फरार होता यावेळी त्याला कोणी मदत केली? याचा तपास करणे गरजेचे असल्याचा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला. त्यामुळं आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, यासोबत आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. तसे आदेश देण्याची मागणी देखील सरकारी वकिलांनी केली. त्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापुरकर संतप्त हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन म्हणाले सरकारचा जावाई आहे का? कोल्हापूरकरांचा सवाल
जुना राजवाडा परिसरात नागरिक हातात कोल्हापूरी चपला घेऊन दाखल झाले होते. कोरटकरला कोल्हापूरी चपलाचे प्रसाद दिल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाहीत. त्याला पोलिसांचे संरक्षण देण्यात येत आहे. पोलीस संरक्षणाची क्या गरज आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कोल्हापूरकरांनी कोरटकर काय सरकारचा जावाई आहे का? असा सवाल उपस्थित केला.
कोरटकरवर बीएनएसअंतर्गत कारवाई
कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने टेक्निकल ईव्हीडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली आहे. त्यानंतर आता पुढची कारवाई पोलिस करतील. तसेच, बीएनएसअंतर्गत जी कारवाई केली जाते ती कोरटकरवर केली जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.