प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कोल्हापूर महानगरपालिकेच्या पावती पुस्तकातील जमा झालेली दंडात्मक रक्कम संबंधित विभागाकडे न भरता स्वतःच हडप केल्या प्रकरणी ठोक मानधन वरील आरोग्य निरीक्षक शिवाजी दिनेश शिंदे (वय 35.रा.मोरे कॉलनी संभाजीनगर ,सध्या रा.वेताळमाळ तालीम जवळ शिवाजी पेठ,कोल्हापूर ) यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद सागर रामचंद्र कांबळे (आरोग्य निरीक्षक ,रा.पाचगाव,को.) यांनी दिली.
यातील आरोपी हा कोल्हापूर महानगरपालिकेकडे ठोक मानधनावर आरोग्य निरीक्षक म्हणुन नेमणूकीस असताना त्यांनी दि.01/04/2019 ते दि.30/06/2022 या कोवीड कालावधीपर्यत कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोवीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी देण्यात आलेल्या सामान्य पावती पुस्तक क्र.93,456 व 480 मधील(3× 100 पाने) आणि त्या पुस्तकातील नागरिकांच्या कडुन जमा झालेली दंडात्मक रक्कम कोल्हापूर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे न भरता स्वतःच वापर करून महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी सोमवार (दि.24) रोजी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.