प्रशांत कोरटकरला 28 मार्च पर्यत पोलिस कोठडी.


 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर -इतिहास संशोधक  इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज याच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता चौथे सत्र दिवाणी न्यायाधिश एस.एस.तट यांनी प्रशांत कोरटकर याला 28 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 जुना राजवाडा पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला तेलंगणा येथे  सोमवार (दि.24 मार्च ) रोजी ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणले.त्यानंतर आज मंगळवार दि.25 मार्च रोजी न्यायालयात हजर केले. 

  याबाबत चौथे सत्र दिवाणी  न्यायाधिश एस.एस.तटसो यांच्या  समोर  सुनावणी झाली. सरकारी वकील ॲड.सुर्यकांत पवार  यांनी सरकारची बाजू मांडली .तर  इंद्रजित सावंत यांचे वकील ॲड. असिम सरोदे यांनी कोरटकर याने केलेले वक्तव्य किती गंभीर आहे, त्याला कायद्याची भिती नाही, राष्ट्रपुरुषांबद्दल त्याच्या मनात द्वेश आहे. मोबाईलमधील डाटा डिलिट करून त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पुरावा नष्ट केल्याने  त्याला सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.

   जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे संतोष गळवे  यांनी न्यायालयात सांगितले की, संशयीत कोरटकर याच्या आवाजाचे नमुने घ्यावयाचे आहेत. त्याने जेव्हा फोन केला त्यावेळी त्याच्यासोबत कोण होते.त्याला वाहनांची सोय कुणी केली.तो फरार काळात कुठे वास्तव्यास होता.त्याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे असल्याने तसेच पोलीस पथक नागपूरला गेले तेव्हा कोरटकर सापडला नाही. या गुन्ह्याबाबत त्याच्याकडून माहिती घ्यावयाची असल्याने  प्रशांत कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी.अशी मागणी न्यायाधिशसो यांच्याकडे केली.

  कोरटकरने आपला मोबाईल व सीम कार्ड ४८ तासात नागपूर पोलिसांकडे जमा केले. त्यानंतर मोबाईल व सीमकार्ड कोल्हापूर पोलिसांना मिळाले; मात्र यातील डाटा डिलिट केल्याचे फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञांच्या निदर्शनास आले. कोरटकर तपास पथकाची दिशाभूल करीत आहे. त्यामळे प्रशांत कोरटकर याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असा युक्तीवाद सरकारी वकील ॲड. सुर्यकांत पवार यांनी केला. 

  बचाव पक्षाचे वकील ॲड. सौरभ घाग यांनी ऑनलाईन पध्दतीने हजर होऊन कोरटकर यांची बाजू मांडताना  कोरटकर तपासात सहकार्य करायला तयार आहेत. पोलीस जेव्हा त्यांना आवाजाचे नमुने घेण्यासाठी बोलावतील तेव्हा ते येतील, त्यांनी मोबाईल, सीमकार्ड जमा केले आहे. ज्या गुन्ह्यात तीन वर्षांच्या आत शिक्षा होऊ शकते, त्यामध्ये अटक करण्याची गरज नाही.असा युक्तिवाद केला.

   दोन्ही बाजूने मंगळवारी जोरदार युक्तीवाद झाला. 

त्यानंतर चौथे सत्र दिवाणी न्यायाधिश एस.एस.तटसो,यांनी सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला 28 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला न्यायालयाच्या मागील बाजूने कोर्टात नेले.या वेळी कोर्टाच्या परिसरात शिवप्रेमीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.या वेळी शिरोळ तालुक्यातील एका कार्यकर्त्याने हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन आला होता.पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला  न्यायालयाच्या बाहेर घेऊन जात असताना बाहेर थांबलेल्या दोघे शिवप्रेमी उदय लाड आणि जयदिप शेळके यांनी  अचानक "शिवाजी महाराज की जय "अशा घोषणा देत प्रशांत कोरटकर याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.या प्रकारामुळे तपासातील एका पोलिस अधिकारी यांनी काही पोलिसांना उद्देशून तुम्ही काही कामाचे नाही.असे म्हणून नाराजी व्यक्त केली.

या वेळी कोर्टाच्या आवारात 100 पेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

या वेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह काही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक न्यायालयात हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post