प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुरातील इतिहास संशोधक डॉ.इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आणि राष्ट्रपुरुषाशांचा एकेरी भाषेत उल्लेख करून त्यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर याला तात्काळ अटक करा नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रोखू असा इशारा इंडिया आघाडी आणि शिवभक्तांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बोलविलेल्या बैठकीत दिला.दरम्यान आंदोलकांना जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन जुना राजवाडा पोलिस अधिकारी यांनी आंदोलकांची समजूत काढ़ण्याचा प्रयत्न केला.मात्र आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत.
प्रशांत कोरटकर याने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.न्यायालयाने कोरटकर याचा जामीन अर्ज मंजूर केल्याने संतप्त झालेल्या कोल्हापूर येथील इंडिया आघाडी आणि शिवभक्त यांनी एकत्र येऊन कोरटकर याच्या विरोधात न्यायालयात आव्हान याचिका दाखल करून त्याच प्रमाणे नागपूर येथे दाखल झालेल्या गुन्हयांत प्रशांत कोरटकर याला तात्काळ अटक करावी अशी मागणी आंदोलनकर्ते यांनी केली आहे.मुख्यमंत्री यांनी प्रशांत कोरटकर याला अटक करूनच कोल्हापूर दौरा करावा अन्यथा गुरुवारी कोल्हापुर दौरयावर येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौरया वेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या निमित्ताने आज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आंदोलनकर्त्यांना बोलावून जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी व इतर पोलिस अधिकारी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.पण आंदोलकांनी आपल्या मतावर ठाम रहात प्रशांत कोरटकर याच्या अटकेची मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या बैठकीत ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे , चंद्रकांत यादव ,हर्षल सुर्वे ,दुर्वासबापू कदम,संपत चव्हाण ,डॉ.सुभाष जाधव,शुभम शिरहट्टी यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते व शिवभक्त उपस्थित होते.