मोटारसायकल चोरट्यांस अटक.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हयातील विविध भागातून मोटारसायकल चोरी करण्यारया शिंगणापूर येथील दर्शन रमेश जाधव (वय 22.सध्या रा.विवेक कोळी यांच्या घरी भाड्याने बुटकेश्वर कॉलनी जवळ,शिंगणापूर .मुळ रा.बालावधुतनगर ,फुलेवाडी) याला करवीर पोलिसांनी अटक केली.त्याच्या कडुन 1 लाख 80 हजार रुपये किमंतीच्या 4 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

प्रसाद महादेव कुंभार (रा.अर्चना पार्क ,शिंगणापूर ,ता.करवीर) यांचे कोल्हापुरातील सुभाषनगर येथे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे.दि.3 मार्च रोजी सायंकाळी भाजी विक्री करुन रात्री दहाच्या सुमारास रहात असलेल्या घराच्या दारात मोपेड गाडी लावून घरी गेले होते.दुसरया दिवशी दारात लावलेली मोपेड गाडी न आढ़ळल्याने याची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयांचा तपास चालू असताना 20 मार्च रोजी करवीर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस   रेकॉर्डवरील गुन्हेगार दर्शन रमेश जाधव हा विना नंबर प्लेट असलेली पांढ़री मोपेड गाडी घेऊन थांबल्याची माहिती मिळाली.त्या प्रमाणे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांना माहिती देऊन त्यांच्या सूचने नुसार पोसई गळवे पोलिस स्टाफसह शिंगणापूर येथील बंधारा जवळ असलेल्या स्मशानभूमी जवळ थांबलेल्या दर्शन जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तीन महिन्यापूर्वी शिंगणापूर येथे अर्चना पार्क येथून मोपेड गाडी चोरल्याचे सांगितले.सदरची गाडी जप्त करून त्याला अटक केली.सदरचा आरोपी हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी तीन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले.त्याने दिलेल्या माहितीनुसार करवीर पोलिसांनी त्याच्या रहात असलेल्या तीन      मोटारसायकली जप्त करण्यात करुन करवीर आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक मा.डॉ.धीरजकुमार बच्चू ,उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post