प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे
कोल्हापुर- लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करण्यासाठी व मुलींना संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी पोलिस दलातील महिला पोलिस अधिकारी आणि महिला पोलिस कर्मचारी यांची "बेटी बचाव -बेटी पढ़ाओ"या अभियनाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
याचा शुभारंभ पोलिस मुख्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून मंगळवार (दि.04 मार्च) रोजी सकाळी आठ वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी झेंडा दाखवून केले.या रॅलीत पोलिस दलातील 100 महिला पोलिस अधिकारी आणि महिला पोलिस कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
याची सुरुवात पोलिस (मुख्यालय ) अलंकार हॉल,धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौक,कावळा नाका,दाभोळकर चौक,व्हिनस कॉर्नर ,लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन,आयोध्या टॉकीज ,वालावलकर कापड दुकान,कोल्हापूर महानगरपालिका,शिवाजी पुतळा,भवानी मंडप ,बिंदु चौक,कॉमर्स कॉलेज,खासबाग मैदान,मिरजकर तिकटी,महाद्वार रोड ,पापाची तिकटी ,सीपीआर चौक आणि दसरा चौक मार्गे येऊन शेवटी दसरा चौकात यांची सांगता झाली.
या रॅलीत "मुलगी शिकली प्रगती झाली ","लेक वाचवा लेक वाढ़वा,"मुलीला समजू नका भार तीच जीवनाचा खरा आधार,"आता मनाशी ठरवा पक्क्ं,शिक्षण हे मुलींनाही हक्क" .या प्रकारच्या घोषणा देत जनजागृती करण्यात आली.
या वेळी पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक श्रीमती पत्की,शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके,शाहुवाडीचे आप्पासो पोवार ,करवीरचे सुजितकुमार क्षीरसागर,स्थानिक गुन्हे अन्वेषचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,सायबरचे सतीश होडगर ,मोटार परिवहन विभागाचे सुरजितसिंग रजपूत वाहतूक शाखेचे नंदकुमार मोरे,शाहुपुरीचे संतोष डोके,लक्ष्मीपुरीचे कन्हेरकर ,करवीरचे किशोर शिंदे,राखीव पोलिस निरीक्षक माने,सपोनि.पाटोळे,अमानवी वाहतूकचे कोल्हाळ,महिला सहा.पोलिस निरीक्षक श्रीमती मगदूम,सहाय्य कक्ष स्वाती यादव,शाहुपुरीच्या क्रांती पाटील,राजारामपुरीच्या सुप्रिया धुरंदे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.