प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- जादा परताव्याचे आमिष दाखवून एक लाखाला प्रत्येक महिन्याला 20% परतावा देण्याच्या उद्देशाने 41 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वैभव कृष्णात पाटील (वय 35) आणि कृष्णात बापूसाहेब पाटील (दोघे रा.बालिंगा पाडळी) या बाप-लेकावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या बाबतची फिर्याद सचिन आनंदराव पाटील (वय 43.रा.चिंतामणी पार्क,फुलेवाडी रिंगरोड ,को.) यांनी दिली.
हा प्रकार दि.08जून 2021ते 04सप्टेंबर 2021या कालावधीत घडला असून यातील मुख्य संशयीत सुत्रधार वैभव कृष्णात पाटील याला चार दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याला मुरगूड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
या गुन्हयांत आणखी काही संशयीताची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे .असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी /पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.पुण्यातील प्रॉफिट मार्ट सिक्युरीटी कंपनीच्या शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास एक लाखाला 20% परतावा देण्याचे आमिष दाखवले होते.
या बाप -लेकानी सचिन पाटील यांच्याशी असलेली ओळख त्यातुन त्यांचा विश्वास निर्माण करून वेळो वेळी गुंतवणूक करण्यास भाग पाडून प्रथम दिड लाख आणि दोनदा 50 हजार रुपये रोख परतावा मिळाल्याने सचिन पाटील यांनी वैभव पाटील यांच्या आणि कंपनीच्या अकौंटवर वेळो वेळी 41 लाख 85 हजार रुपये भरले.गुंतविलेल्या रक्कमेचा शिल्लक परतावा आणि मुद्दल परत मिळण्यासाठी सचिन पाटील यांनी या बाप-लेकाकडे पाठ पुरावा केला पण त्यांनी दाद लागू दिली नाही.
या बाप-लेकांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतो असे खोटे सांगून स्वतच्या फायद्या साठी त्या रक्कमेचा वापर केल्याचे आढ़ळल्याने सचिन पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी संशयीताना रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतले नसल्याचे समजते.
----------------------
फसवणूक झाल्याने आत्महत्या करण्याचा विचार -सचिन पाटील.
13 आणि 7 वर्षाच्या मुलांच्या भवितव्या साठी आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी सचिन पाटील आणि त्यांच्या पत्नीने मोठ्या कष्टाने कमाई केलेली पुंजी विविध बँकेत सुरक्षीत ठेवली होती.मात्र वैभव पाटील यांनी ओळखीचा फायदा घेऊन सचिन पाटील याचा विश्वास संपादन करून सुरुवातीला अडीच लाखाचा परतावा मिळाल्याने सचिन पाटील यांनी मागचा पुढचा विचार न करता 41 लाख 85 हजारांची रक्कम गुंतवणूक केली.सचिन पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच सचिन पाटील आणि त्यांच्या पत्नीला रडू कोसळले. त्यांना मोठा धक्का बसल्याने आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता असे सांगितले.यावेळी पोलिसांनी त्यांना धीर दिला.