प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे सध्या रुग्णालय अंतर्गत विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे व ड्रेनेजची कामे सुरु असल्याने नव्या अपघात विभागा समोरील मुख्य दरवाजा बंद केलेला असून शाहू स्मारक भवन कडील दरवाजा वाहतुकीसाठी खुला केलेला आहे. रुग्णालयामध्ये विविध ठिकाणी बांधकामे सुरु असल्याने रुग्णालयामधील अपघात विभागातून रुग्ण आयसीयु किंवा कक्षामध्ये स्थलांतर करणे, अॅब्युलन्स, ऑक्सिजन पुरवठा वाहन, अत्यवस्थ रुग्ण यांची गैरसोय होऊन रुगणसेवा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे दि. १३ मार्च २०२५ रोजी पासून रुग्णसेवेच्या दृष्टीने खाजगी वाहनास रुग्णालय आवारामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये या करीता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी केले आहे.