दसरा चौक येथे मोटारसायकल वरुन आलेल्या तरुणांकडुन तीन गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त.




प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-  स्थानिक गुन्हे अण्वेषण पथकाने दसरा चौक येथे मोटारसायकल वरुन आलेल्या प्रथमेश भटुपंत गायकवाड (वय 20.रा.येल्लुर ता.वाळवा जि.सांगली) व राम मारुती सावंत (वय 19.पुलाची शिरोली  यादववाडी,ता.हातकंणगले) या दोघांना दसरा चौक येथे  आणि शुभम शंकर मासुळे (,वय 23.रा.इंदिरानगर यवत,ता.दौड) याला यवत येथे ताब्यात घेऊन अशा तिघांना अटक करून त्यांच्या कडील 3 गावठी पिस्टल आणि 1जिवंत काडतुस ,एक मोटारसायकल व इतर असा एकूण 2 लाख 82 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.                    

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर हत्यार बाळगणारे इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.      

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी या पथकातील पोलिसांची तपास पथके तयार करून माहिती घेत असताना वाळवा तालुक्यातील येल्लुर येथील प्रथमेश गायकवाड याच्याकडे विनापरवाना पिस्टल असून आज तो आपल्या साथीदारासमवेत मोटारसायकल वरुन दसरा चौकात येणार असल्याची माहिती या पथकातील पोलिस संदिप बेंद्रे यांना मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने 25 मार्च रोजी दसरा चौक येथे सापळा रचून मोटारसायकल वरुन आलेल्या प्रथमेश गायकवाड आणि राम सावंत या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे मिळालेली गावठी पिस्टल आणि काडतूस हे विक्री करण्यासाठी दौड तालुक्यातील यवत येथील शुभम मासुळे यांनी दिल्याचे पोलिसांना सांगितले.या पथकातील पोलिसांनी यवत येथे जाऊन शुभम मासुळे याला ताब्यात घेऊन अटक केली.या तिघांच्या विरोधात हत्यार कायद्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पुढ़ील तपास लक्ष्मीपुरी पोलिस करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post