प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात समाजवादी प्रबोधिनी व महिला सबलीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी महापालिकेच्या उपायुक्त मा रोशनी गोडे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जा. स्पर्धा परीक्षाकडे वळा, प्रशासनामध्ये महिलांची टक्केवारी अतिशय नगण्य आहे, ती वाढली पाहिजे, महिला निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, सबल आहेत आणि त्याचा फायदा प्रशासनाला झाला पाहिजे, यासाठी अभ्यास करा, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी समाजवादी प्रबोधिनीचे मा. प्रसाद कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते, त्यांनीही विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले सारख्या महिलांनी अंगावरती चिखल,गोळे सहन करून तुम्हाला शिकवलेलं आहे,संपूर्ण स्री जातीला शिकवलेलं आहे आणि काहीतरी करण्याची प्रेरणा दिलेली आहे, तर तो वसा आणि वारसा तुम्ही जपला पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे होते, त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रथेप्रमाणे महाविद्यालयाची कन्या सुकन्या म्हणून कुमारी तेजश्री शिंदे हिचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.स्वाती हाळवणकर यांनी केले. आभार प्रो.डॉ.त्रिशला कदम यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.