अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इंचलकरंजी - पत्नी दुसरीकडे लग्न करत असल्याचे समजल्याने अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेऊन भाजून जखमी झालेला शेखर अर्जुन गायकवाड (वय 31.रा.करकंब,ता.पंढ़रपूर जि.सोलापूर ) याचा मंगळवार (दि.11 मार्च) रोजी दुपारी एकच्या सुमारास सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील भाजून जखमी झालेला शेखर गायकवाड याने इंचलकरंजी येथील महिलेशी दुसरा विवाह केला होता.त्या महिलेचे ही दुसरा विवाह होता.त्यांनी ओळखीतुन दोघांनी विवाह केला आहे.त्यानंतर शेखर त्रास देत असल्याच्या कारणातुन त्याची पत्नी माहेरी इंचलकरंजी येथे रहात होती.तिच्या नातेवाईकांनी शेखर कडुन साध्या पद्धतीने सोडपत्र लिहून घेतले होते.दरम्यान तिच्या नातेवाईकांनी सदर महिलेचे दुसरीकडे विवाह लावून देण्याच्या तयारीत असल्याची माहिती शेखर गायकवाड याला समजली.त्यामुळे तो गुरुवार (दि.06 मार्च) रोजी इंचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस येऊन पोलिसांना सर्व माहिती दिली.त्या वेळी पोलिसांनी त्याला सबुरीने घ्या यातुन काही तरी मार्ग निघेल असा धीर धरण्याचा सल्ला दिला.त्या नंतर पोलिसांनी  पत्नीच्या माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन चौकशी केली असता नातेवाईकांनी पोलिसांना त्याच्या कडुन घेतलेली नोटरीची कागदपत्रे दाखवली.ही कागदपत्रे  पोलिस पहात असताना शेखर गायकवाड याने पोलिस स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतले.त्यावेळी तेथील पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असताना काही पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.यात शेखर गायकवाड भाजून गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम इंचलकरंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे उपचार चालू असताना   आज त्याचा मृत्यु झाला.

Post a Comment

Previous Post Next Post