प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर,दि.९ (प्रतिनिधी) विविध समाज बांधवांच्या वतीने कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नियोजनासाठी बैठक पार पडली.
या बैठकी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वधर्मीय जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रमणमळा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गोविंद कुलकर्णी व कार्याध्यक्षपदी रुई चे मच्छिंद्र रुईकर यांची निवड करण्यात आली.तसेच कार्यकारणी मध्येउपाध्यक्ष सतीश रास्ते, सचिव संजय कांबळे, सहसचिव प्रशांत अवघडे, कोषाध्यक्ष निवासराव सूर्यवंशी व सदस्यपदी अमोल कांबळे, संतोष आठवले, अमोल कुरणे, स्वाती माजगांवे, लता गायकवाड, माधुरी हिरवे, वासंती देवकुळे, योगिता संकपाळ, समीर विजापुरे, मुकेश घाडगे , भैय्यासाहेब धनवडे , संतोष खरात, चंद्रकांत चौगुले, अक्षय कदम यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस एकनाथ जोशी, संजय सोनवणे, एस के कॅम्पुटर्सचे उमेश कुंभार, सुनील परीट, ईश्वर स्पोर्ट्स चे राहुल पाटील, अशोक घाडगे, गर्जना फायनान्सचे प्रवीण भाटणवाडे संजय सुळगावे, आदित्य कुंभार, प्रा. आनंद भोजने आदी उपस्थित होते.