प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील वाशी येथील यात्रेत भंडारा लावण्यावरुन व पालखी जवळ थांबण्यावरुन झालेल्या वादातुन वाशी गावचे मानकरी उदयानी सांळूखे यांच्या दारावर लाथा मारुन तेथील खिडक्या,सीसीटिव्ही ,दारातील लाईटचा मोठा बल्ब विटा आणि दगडाने फोडून तसेच निलेश हजारे यांच्या गाडीच्या काचा काठीच्या सहाय्याने फोडून नुकसान केल्या प्रकरणी करवीर पोलिसांनी सरदार उर्फ शामराव दादासो रानगे ,धनाजी बाबूराव रानगे,सुनिल भगवान रानगे ,आनंदा सोमा रानगे,अनिकेत संभाजी रानगे ,संस्कार अजित रानगे,शिवाजी बिरु रानगे आणि पद्मा सरदार रानगे (सर्व रा.वाशी) या आठ जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद शिवाजी विठ्ठल पुजारी (वय 46.रा.वाशी) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.हा प्रकार शनिवार (1मार्च) रोजी रात्री 12 ते पहाटे 2 च्या सुमारास भानुदास मंदीरच्या पायरी जवळ आणि उदयानी सांळूखे यांच्या वाड्यावर घडला होता.
यातील फिर्यादी आणि आरोपी एकाच गावचे असून शनिवारी भानुदास मंदीरजवळ पालखी आली असता सरदार उर्फ शामराव रानगे यांने शिवाजी पुजारी आणि त्यांच्या इतर साथीदारांना भंडारा मी लावणार असून पालखी जवळ थांबणार असे म्हणत शिवाजी बिरु रानगे याला पालखी जवळ उभे करून तेथून पालखी पुढ़े गेल्यावर सरदार रानगे आणि त्याचे इतर साथीदारांनी मिळून शिवाजी पुजारी,संभाजी आनंदा पुजारी आणि सुनिल विठ्ठल पुजारी यांच्या बरोबर वाद घालत त्यांना शिवीगाळ करत धक्काबुकी केली हा वाद मिटविण्यासाठी गावातील मानकरी उदयानी सांळूखे व त्यांचा मुलगा हर्षवर्धन यांनी वाड्यावर बैठक बोलविली होती.ही बैठक चालू असतानाच आरोपीनी वरील प्रकार केला.