प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : प्रतिनिधी :
कोल्हापूर- तक्रादाराकडून सातबारा आणि फ़ेरफ़ार दुरुस्त करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना सुरेश जगन्नाथ खोत (वय 49.रा.भैरेवाडी ,ता.शाहुवाडी जि.कोल्हापूर ) याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली.
यातील तक्रारदार यांच्या मामे भाऊ आणि त्यांच्यासह हिस्सेदारांनी मौजे सावे येथे जमीन खरेदी केली होती.सदर जमिनीच्या गट नंबर मध्ये खाडाखोड होऊन चुकीच्या गट नंबरची नोंद झाली होती.सदर मध्ये खाडाखोड करण्यारयावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून पुर्ववत सातबारा आणि फ़ेरफ़ार दुरुस्त करून मिळण्यासाठी शाहुवाडी येथील तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज केला होता.सदर अर्जाचा पाठ
पुरावा यातील तक्रारदार करीत होते.या अर्जाची तहसीलदार यांच्याकडे सुनावणी चालू होती.यातील तक्रादार तहसीलदार कार्यालयात येऊन दिलेल्या अर्जाचे काम कुठं पर्यत आले आहे.हे पहाण्यासाठी संबंधित विभागाकडे गेले असता त्या ठिकाणी तक्रारदार यांना सुरेश खोत यांची भेट झाली.त्यांने तक्रारदाला तुमचे प्रलंबित असलेले काम तहसीलदार यांच्या कडुन करून देतो.मात्र तहसीलदार यांना देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली.त्या नंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.दरम्यान लाचलुचपत विभागाने तक्रादाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी करून केली असता सुरेश खोत यांने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत पथकाने सुरेश खोत याला तक्रारदाराकडुन पाच लाख रुपये घेताना रंगेहात पकडून कारवाई केली.सदर सुरेश खोत याच्यावर शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील,स.पो.फौ.प्रकाश भंडारे ,पोलिस विकास माने,संदिप काशीद,सुधीर पाटील,उदय पाटील आणि चालक प्रशांत दावणे यांनी केली.