स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घरफोडीतील तिघांना अटक करून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घरफोडीतील राजकुमार वासीम मलीक (वय 29.रा.अष्टविनायक चौक ,राजारामपुरी को.) विपुल वासीम मलीक (वय 26.रा.तामगांव रोड ,जाधव कॉलनी, ऊजळाईवाडी) आणि आदित्य भिमराव दिंडे (वय 23.रा.नवशा मारुती मंदीर जवळ,राजारामपुरी ,को.) या तिघांना अटक केली.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडीतील गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुशंगाने पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर  यांनी तपास पथके तयार करून घरफोडीचे गुन्हें उघडकीस आणण्याच्या अनुशंगाने प्रयत्न करत असताना या पथकातील पोलिस अंमलदार यांना माहिती मिळाली की ,पोलिस रेकॉर्डवरील  राज मलीक यांने आपल्या साथीदारांच्या मदतीने घरफोडी केली असून तो आणि त्याचे साथीदार चोरीतील दागिने विकण्यासाठी निर्माण चौक येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील चोरीतील दोन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ,ग्यस टाकी,मोबाईल आणि गुन्हयांत वापरलेली मोपेड जप्त करण्यात आली आहे.सदर गुन्हयांची माहिती घेतली असता आरोपीनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केली असून या तिघांच्यावर  जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याने त्या तिघांना पुढ़ील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post