प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून फरारी झालेल्या ए.एस.ट्रेडर्स/डेव्हलपर्स एलएलपी कंपनीच्या संचालिका सुधा सुधाकर खडके (वय 62.रा.गुणे गल्ली,गडहिग्लज) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
ए.एस.ट्रेडर्सच्या संचालकांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती.या बाबत या कंपनीच्या संचालका विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि त्यांचे तपास पथक करीत आहे.सदर गुन्हयांत आता पर्यत 17 आरोपींना अटक करून त्यांच्यावर कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.सदर गुन्हयांच्या तपासात ए.एस.ट्रेडर्स आणि त्यांच्या इतर कंपनीच्या संचालकांच्या नावे असलेल्या 13 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनास सादर केला होता.या प्रस्तावावर महाराष्ट्र प्रधान सचिव यांनी जप्त केलेल्या मालमत्ता यांच्या वर देखरेख ठेवण्यासाठी (दि.07 मार्च) रोजी उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.ए.एस.ट्रेडर्सच्या संचालीका सुधा खडके या गुन्हा घडल्या पासून सव्वा दोन वर्षांपासून फरारी झाल्या होत्या.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथकाला फरारी झालेल्यांचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या अनुशंगाने तपास अधिकारी यांनी मिळालेल्या माहितीनुसार व तांत्रिक तपास पथकातील राजू येडगे,विजय काळे,प्रविण पाटील,राजेंद्र वरंडेकर यांनी या गुन्हयांतील फरार झालेल्या संचालिका सुधा खडके यांना गोवा येथील तळेगांव दुर्गावडी येथून 22 मार्च रोजी अटक करण्यात आली.
आज दि.23 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्हयांचा तपास पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या पर्यवेक्षणाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या तपास पथकांनी केली.