प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
जयसिंगपूर - हातकंणगले तालुक्यातील जैनापूर परिसरात असलेल्या चिपरी फाटा येथे झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू आहेत.जखमी मध्ये आदिनाथ कुमार पाटील (वय 45.रा.मजले ,ता.हातकंणगले ),सुगला उत्तम कांबळे (वय 65.रा.राजेंद्रनगर ,को.) आणि किरण नामदेव वडर (वय 47.रा.जागृतीनगर ,को.) यांचा समावेश आहे. हा प्रकार बुधवार (दि.12 मार्च) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील जखमी आदिनाथ पाटील हा मजले येथे रहात असून मिरज येथील एमआयडीसी येथे नोकरीस आहे.आज सकाळी आदिनाथ पाटील हा मोटारसायकल वरुन घरी परत येत असताना जैनापूर येथील चिपरी फाटा येथे आला असता समोरुन येत असलेल्या रिक्षाला जोराची धडक बसल्याने याच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाला.त्याच प्रमाणे रिक्षातील सुगला कांबळे आणि किरण वडर हे जखमी झाले.