प्रेस मीडिया लाईव्ह :
भीम आर्मी भारत एकता मिशन व आजाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तसेच लोकसभा खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जळगाव जिल्हा प्रमुख गणेश भाई सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पद्मालय गेस्ट हाउस, जळगाव येथे जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमात सरदार बलदार तडवी यांची जिल्हा उपाध्यक्ष, फिरोज अब्बास तडवी यांची जिल्हा सचिव, तर राहुल लक्ष्मण जयकर यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे, संदीप सपकाळे, जावेद शेख, हेमराज भाऊ तायडे, रावेर तालुका अध्यक्ष राहुल निंभोरे, रावेर तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी, तसेच मल्हार भाऊ, शकील भाई, विशाल भाऊ, सूरज भाई, कलीम दादा आदी मान्यवर उपस्थित होते.
या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यात संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल व सामाजिक न्यायासाठीची चळवळ अधिक जोमाने पुढे नेली जाईल, असा विश्वास गणेश भाई सपकाळे यांनी व्यक्त केला.