प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१२ समाजवादी प्रबोधिनीच्या ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाच्या मार्च २०२५ या अंकाचे प्रकाशन नवी दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक लेखिका डॉ. तारा भावळकर यांच्या हस्ते सांगली येथे त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले .
यावेळी डॉ. तारा भवाळकर यांनी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या गेल्या छत्तीस वर्षाच्या सातत्यपूर्ण वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ. भवाळकर यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या या अंकामध्ये डॉ.तारा भवाळकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संक्षेपयत्न, विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ . अशोक राणा यांचे विचार आणि डॉ. आंबेडकर :समता- समानता व समाजवाद या विषयांवर प्रसाद कुलकर्णी यांचे संपादकीय लिहिले आहे. त्याचबरोबर समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा .डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारा सरोज देशपांडे यांचा लेख समाविष्ट आहे. त्याचबरोबर प्रा.डॉ .अशोक चौसाळकर,डॉ.दशरथ पारेकर ,डॉ. रफिक सुरज डॉ.संजीव चांदोरकर यांचे लेख तसेच भरत यादव यांनी राजहंस सेठ व मनमित सोनी यांच्या कवितांचे केलेले अनुवाद या अंकात आहेत. तसेच पंचवीस वर्षांपूर्वीचे प्रबोधन व प्रबोधिनी वार्ता ही नियमित सदरेही या अंकात आहेत.तसेच या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रत्यूष कुलकर्णी यांनी काढलेले अजंठा लेण्यांचे छायाचित्र आहे.यावेळी या मासिकाचे संपादक प्रसाद कुलकर्णी आणि संपादक मंडळ सदस्य प्राचार्य आनंद मेणसे यांच्यासह बबन कानशिडे ,सतीश पाटील, रावजी पाटील, आनंद पाटील, दशरथ पाटील डॉ.एन.डी.पाटील, शिवाजी नांदूरकर, राजेन्द्रकुमार चलवादी, ज्योतिबा कुडकेकर,,नारायण बस्तवाडकर आदी उपस्थित होते.