प्रेस मीडिया लाईव्ह;
मुरलीधर कांबळे :
इंचलकरंजी -पत्नीसाठी शेखर अर्जुन गायकवाड (वय 31.रा .करंबळ,सोलापूर ) याने पत्नी दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे समजले वरुन त्याने इंचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्याला आगीचा चटका बसू लागल्याने तो सैरभैर होऊन इकडे तिकडे धावू लागला पोलिसांनी त्याला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
हा प्रकार गुरुवार (दि.06) रोजी दुपारी पाचच्या सुमारास घडला.या लागलेल्या आगीत शेखर हा 50 ते 60 टक्के भाजला असून त्याला इंचलकरंजी येथील रुग्णालयात दाखल केले होते तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शेखर हा विवाहित असून त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी रहाते.त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी न देता दुसरा विवाह करणार असल्याची माहिती शेखर याला समजली असता त्याने इंचलकरंजी येथे येऊन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात माहिती दिली.पोलिसांनी त्याला समजुतीने घेण्याचे सांगितले.त्यानंतर पोलिसांनी पत्नीच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन चौकशी केली .शेखर हा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याने पोलिस ठाण्याच्या आवारातच अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतले.
त्याने पोलिस ठाण्याच्या आवारात पेटवून घेतल्याने पत्नीच्या नातेवाईक घाबरले.तसेच पोलिसांत ही या घटनेने मोठी खळबळ उडाली.