हेरले येथील प्राथमिक शाळेला मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री. अमोल येडगे यांची भेट

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

हेरले प्रतिनिधी संदीप कोले 

निपुण भारत अभियान अंतर्गत, प्राथमिक शाळेतील शंभर टक्के  विद्यार्थ्यांना पायाभूत अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी 45 दिवस कार्यक्रम भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे.शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी सुरू आहे. 

या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आज शाळेमध्ये भेट देऊन वर्गाची पाहणी केली.तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेचे कामकाज उत्कृष्टपणे चालू असल्याबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील केंद्रीय प्राथमिक शाळा हेरले, कन्या शाळा हेरले, शाळा नंबर २ हेरले च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने व जल्लोषात करण्यात आले. 

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्वागत हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच श्री.राहुल शेटे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  श्री.रवींद्र चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामसेवक श्री.बी. एस .कांबळे केंद्रप्रमुख श्री.शहाजी पाटील, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय राबाडे, शाळा नं 2  चे मुख्याध्यापक श्री.प्रभाकर चौगुले, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती कोरे, हेरले गावाचे तलाठी श्री.चांदणे साहेब, तिन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post