सेन्सर बोर्डाच्या अध्यक्ष याच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा दलित पँथरची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

हेरले /संदीप कोले 

महान कवी दलित पॅन्थर चे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्यावर आपत्ती जनक टिप्पनी केल्या प्रकरणी सेन्सर बोर्ड अध्यक्ष याच्या वर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी दलित पँथर ने प्रांतधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे . 

 कोण, नामदेव ढसाळ व त्यांच्या कविता सिनेमा तुन काढून टाकण्यासाठी निर्मात्यांना सूचना केली होती या प्रकारच्या टिप्पनी मुळे समस्त दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून सेन्सर बोर्ड अध्यक्ष यांस पदावरून हाकलून द्यावे व त्याच्या वर गुन्हा दाखल करावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देणेत आला यावेळी राज्य सरचिटणीस मा. प्रा. अशोक कांबळे सर अब्दुल गफुर् शेख मोहन नाईक मुबारक शेख अतिश बनसोडे सल्लागार अपेक्षा कांबळे,रवींद्र विटेकर,चंद्रकांत पवार, अविनाश कांबळे, सुधीर कमलाकर, सतीश माने, ज्योती भास्कर दीपक जाधव, संतोष कोठावळे,पद्मा जाधव, प्रकाश केसरकर  संगीता गोसावी इ उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post