प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायत यांच्यामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मॅरेथॉन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेसाठी जवळपास 60 ते 70 महिलांनी सहभाग नोंदवला खास करून या स्पर्धेमध्ये वयोवृद्ध म्हणजेच 60 ते 65 वयोगटातील आजीने सहभाग नोंदवला व स्पर्धा संपन्न केली तसेच महिलांसाठी लहान गट व मोठा गट रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सर्व स्पर्धकांना ग्रामपंचायत मार्फत विशेष गिफ्ट देण्यात आले
या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच सुशांत वडृ, उपसरपंच भगवान पाटील, सदस्य बाबासो पाटील, अनिरुद्ध कांबळे ,राजेंद्र कांबळे ,नितीन पाटील, सदस्या अक्काताई शिंदे, कलावती गुरव, छाया पाटील, दिपाली पाटील, कल्पना पाटील, वर्षा बिडकर, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे,माजी सरपंच पल्लवी चौगुले, महिला अध्यक्षा शारदा पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर उषाराणी खोत, आरोग्य सेवक महेश वडर, आशा वर्कर, सर्व अंगणवाडी सेविका ,मदतनीस, विद्यामंदिर अतिग्रे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ, महिला बचत गट, सीआरपी व सर्व महिला मंडळ अतिग्रे, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते