मदरसा संस्थेला दिले २५ हजाराची नीधी, मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि:- माणुस म्हणून जगताना समाजाचे ऋण देणे लागतो समाजाला काही तरी देणे हे सर्वाचे कर्तव्य आहे असेच कर्तव्य समजून रमजानच्या पवित्र सणा निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाओ चे प्रणेते व नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर सेठ अगरवाल यांच्या ट्रस्टच्या वतीने मुस्लिम बांधवांना शीरखुर्मा चे साहित्य वाटप करण्यात आले.
देहुरोड शहर हे मीनी इंडिया म्हणून ओळखले जाते येथे नेहमी सर्व धर्म समभाव म्हणून या देहुरोड शहराला ओळखले जाते रमजानच्या पवित्र सण असल्याने मुस्लिम बांधन संपुर्ण एक महिना रोजा ठेवून उपवास करत असतात या रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव ही देवा चरणी नतमस्तक होऊन सर्वान साठी दुआ करत असतात आणि रोजा संपन्न झाल्यानंतर रमजान ईद उत्साहात साजरा करीत असतात नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट हे प्रत्येक जाति धर्माचे सण असो महापुरुषांचे जयंती असो व कुठल्याही देवाचे कार्य असो नेहमी सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत असते असेच रमजानच्या पवित्र ईद च्या निमित्ताने नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोरगरिबांना सण साजरा करता यावा म्हणून ट्रस्टच्या वतीने शेवई , तांदूळ, साखर, बेदाणे, किशमिश, खजूर असे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गोर गरीब शिकत असलेल्या मदरसाला यावेळी नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने २५ हजार रूपये नीधी चे धनादेश ही देण्यात आले यावेळी जामा मस्जिद से सदस्य अनिस शेख यांनी नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर सेठ अगरवाल यांचे कौतुक करून आभार प्रकट केले.
हा कार्यक्रम देहुरोडच्या जामा मस्जिद येथे घेण्यात आले यावेळी नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर सेठ अगरवाल यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या सर्वाना शुभेच्छा दिल्या यावेळी ईश्वर सेठ अगरवाल यांच्या पत्नी संस्थेच्या उपाध्यक्षा अनिता अगरवाल सह शिवसेना (शिंदे गट) चे शहर प्रमुख दिपक चौगुले, रिपाइंचे युवा नेते अमित छाजेड मुस्लीम समाजचे जेष्ठ नेते गफुरभाई शेख, जामा मस्जिद ट्रस्टचे सदस्य अनिस शेख, इम्रान शेख आदि उपस्थित होते.