गोवा बनावटीची दारुची वाहतूक केल्या प्रकरणी तोतया कर्मचारयासह लष्करातील निवृत्त जवानाला अटक करून साडे सत्तावीस लाख रुपये किमंतीचा मद्यसाठा जप्त.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कोल्हापूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोवा बनावटीची दारुची वाहतूक केल्या प्रकरणी नितीन दिलीप ढ़ेरे (वय 33.रा.जाधववाडी,मार्केट यार्ड ,कोल्हापूर) व शिवाजी आनंदा धायगुडे (वय 57.रा.अंदोरी ,ता.खंडाळा) यांना  अटक करून साडे सत्तावीस लाख रुपये किमंतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

गडहिग्लज येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला दि.23 मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार नेसरी गडहिग्लज रोडवर गस्त घालत असताना भरारी पथकाला माहिती मिळाली की ,एका इनोव्हा कार मधून गोवा बनावटीची दारु आणून ती मारुती डिझायर कार मध्ये महागांवच्या परिसरात असलेल्या ओढयाजवळ गोवा बनावटीची दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने रात्री सव्वा तीनच्या सुमारास नेसरी गडहिग्लज रोडवरील महागाचच्या ओढ़याजवळ रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली टोयाटो कंपनीची इनोव्हा क्रिस्टा आणि त्याच्या विरुध्द बाजूला मारुती सुझूकी डिझायर ही चारचाकी वाहन थांबल्याचे आढ़ळून आली.त्याची तपासणी केली असता एका वाहनात सरकारी गणवेश घातलेला तोतया कर्मचारी आणि दुसरया वाहनात निवृत्त लष्करी जवान असल्याचे निदर्शनास आले.त्या दोन्ही  वाहनाची तपासणी केली असता त्या दोन्ही वाहनाच्या आतील बाजूस कागदी पुठ्ठयाच्या बॉक्स मध्ये 750 मिली.गोवा बनावटीची दारु असलेली सिलबंद बाटल्या मिळून आल्या.त्यात एकूण 432 सिलबंद केलेल्या बाटल्या (36) बॉक्स मिळून आला असून सदर दोन वाहनासह एकूण साडे सत्तावीस लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे भासविण्यासाठी शासकीय गणवेश घालून फसवणूक करणारा तोतया कर्मचारी नितीन ढ़ेरे आणि लष्करातील निवृत्त जवान शिवाजी धायगुडे यांना अटक करून या गुन्हयांत आणि कुणाचा समावेश आहे का ? तसेच जप्त केलेला मद्य साठा कुठे नेणार होता.याचा तपास सुरु असून या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांनी दिली.

या कारवाईत निरीक्षक श्री.संजय शिलेवंत,दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांच्यासह जवान देवेंद्र पाटील,आशिष पोवार,सुशांत पाटील,आदर्श धुमाळ,राहुल गुरव ,पोहेकॉ.रामचंद्र मळगावकर ,व रामचंद्र साटेलकर यांनी भाग घेतला असून याचा पुढ़ील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post