प्रेस मीडिया लाईव्ह:
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पोलिस असल्याचे भासवून मणेर मळा येथील एकाची फसवणूक केल्या प्रकरणी महेश निवृत्ती पाटील(वय 34.रा.महादेव गल्ली,आवळी,ता.पन्हाळा) याला शाहुपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
मणेर मळा येथील निलेश कोंडिबा सावंत यांना महेश पाटील याने मार्च एंडिंग असल्याने रात्री उशिरापर्यंत फिरता येत नाही. नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल, असं सांगून पोलिस असल्याचं भासवून त्यांच्या कडील बळजबरीने मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीनं दंड स्वरुपात रक्कम घेऊन तसेच जबरदस्तीनं २० हजाराचा मोबाईल हिसकावून घेतल्या प्रकरणी निलेश सावंत यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. हा प्रकार (दि.12 फ़ेब्रु). रोजी रात्रीच्या सुमारास शाहुपुरीतील वामन गेस्ट हाऊस येथे घडला होता. सदरच्या गुन्हे अनुशंगाने पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी गुन्हे शोध पथकाला तपास करण्याचा सूचना दिल्या होत्या.
सदरचा गुन्हा हा आवळी येथील महेश पाटील यांने केला असून तो मार्केट यार्ड येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि बळजबरीने काढ़ुन घेतलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश निवृत्ती पाटील याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
करवीर तालुक्यातील उचगाव मणेर मळा येथील निलेश सावंत हे दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. त्यांना घरी जाण्यास रात्री उशीर झाला.मोटारसायकल वरुन शाहूपुरी मार्गे घरी जात असताना पाठी मागून आलेल्या दोघांनी सावंत यांना अडवून त्या दोघांनी पोलीस असल्याचे सांगितले.मार्च एंडिंग सुरू आहे.रात्री उशिरापर्यंत फिरता येत नाही. त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. असं त्यातील एक जणाने सावंत यांना सांगितले. त्यानंतर सावंत यांच्या मोबाईलवरून त्या भामट्यानी स्वतःच्या मोबाईलवर सहाशे रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करायला लावले. तसेच सावंत यांचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेऊन दोघांनी पोबारा केला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याच लक्षात आल्याने निलेश सावंत यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत तसेच ऑनलाइन पद्धतीन ज्या मोबाईलवर पैसे पाठवले होते, त्यावरून नंबर ट्रेस करून संशयीताचा शोध घेत घेतला.या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे राहणाऱ्या महेश पाटील या संशयीताला अटक केली.त्याला
न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुन्हयांचा पुढ़ील तपास शाहुपुरीचे पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर हे करीत आहेत.