प्रेस मीडिया लाईव्ह :
औरवाड प्रतिनिधी :
नृसिंहवाडी औरवाड मोठ्या फुलावर मधमाशांनी थैमान घातल्याने शिरोळ तालुक्यातील पाच जणांना मधमाशांनी चावा घेतला होता. या घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे माहीती मिळताच, त्यांनी तातडीने वजीर रेस्क्यू फोर्सच्या अध्यक्षांशी संपर्क साधला आणि सर्व यंत्रणा सतर्क ठेवल्या. त्यानंतर, आरोग्य विभागाच्या दोन रुग्णवाहिका,कुरुंदवाद नगरपालिकेचे अग्निशमन दल, कुरुंदवाड नगरपालिकेची रुग्णवाहिका आणि वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान यांच्या मदतीने रात्री साडेनऊच्या सुमारास मधमाशांचे मोहोळ यशस्वीरित्या काढण्यात आले.
जिल्हा आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या तातडीच्या प्रतिसादाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.