प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत मार्फत विशेष महिला सभेचे आयोजन व मॅरेथॉन, रांगोळी स्पर्धा, फॅशन शो, संगीत खुर्ची कार्यक्रमाचे बक्षीस वितरण व ऑन द स्पॉट गेम कार्यक्रम घेण्यात आला प्रथमता प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सौ गर्दे मॅडम यांनी केले नंतर या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा माजी खासदार डॉक्टर श्रीमती निवेदिता माने ( वहिनीसाहेब ) यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ग्रामपंचायत महिला सदस्य यांचे मार्फत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सारिका पाटील मॅडम यांनी केले माननीय निवेदिता माने वहिनीसाहेब यांनी सर्व महिलांना योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन दिले व केडीसी बँकेमार्फत महिलांना उद्योग करण्यासाठी कर्ज प्रकरणासाठी मी स्वतः प्रयत्न करीन असे सांगण्यात आले या कार्यक्रमांमध्ये विशेष म्हणजे निवेदिता माने वहिनीसाहेब यांनी सांगितले की रुकडी गावचे सुपुत्र ग्राम विकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे हे उत्कृष्ट असे ग्रामविकास अधिकारी आहेत ते जेथे जेथे काम करतात तेथे चांगले काम करत आलेले आहेत आज ते अतिग्रे गावासाठी लाभले आहेत ते तुम्हा अतिग्रे करांना मोठे योगदान आहे आज हातकणंगले तालुक्यामध्ये प्रथमता महिला दिनाचा इतका मोठा कार्यक्रम अतिग्रे येथे संपन्न करण्यात बाबासाहेब कापसे यांचे मोठे श्रम आहे असे सांगण्यात आले तसेच या कार्यक्रमांमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती हातकणंगले माननीय श्रीमती सुजाता शिंदे मॅडम व लघु उद्योजक सौ दिपाली चौगुले मॅडम यांनी महिलांना योग्य पद्धतीचे चांगले मार्गदर्शन केले हा कार्यक्रम चांगला उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी माजी सरपंच पल्लवी चौगुले व महिला अध्यक्षा शारदा पाटील यांचे मोठे योगदान लाभले आहे
या कार्यक्रमांमध्ये फॅशन शो, संगीत खुर्ची, ऑन द स्पॉट गेम कार्यक्रम, मॅरेथॉन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले व गावातील सर्व महिलांना ग्रामपंचायत मार्फत सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले बचत गट महिलांनी या कार्यक्रमांमध्ये स्टॉल लावण्यात आले होते
या कार्यक्रमास उपस्थित गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकणले माननीय डॉक्टर शबाना मोकाशी मॅडम, ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुशांत वडृ, उपसरपंच भगवान पाटील, सदस्य बाबासाहेब पाटील, राजेंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, नितीन पाटील, सदस्या अक्काताई शिंदे, कलावती गुरव, छाया पाटील, दिपाली पाटील, कल्पना पाटील, वर्षा बिडकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सीआरपी, आरोग्य केंद्र डॉक्टर आशा वर्कर, महिला बचत गट, विद्या मंदिर शिक्षक स्टाफ, व गावातील महिला वर्ग उपस्थित होत्या शेवटी आभार अमृता पाटील यांनी मांडले