प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
राधानगरी - मोटारसायकल वरुन गावी येत असताना एका मोटारसायकल स्वाराने पाठीमागून धडक दिल्याने साताबाई मारुती वांगणेकर (वय 54.रा.माळवाडी,चक्रेश्वरवाडी ता.राधानगरी) यांचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे . हा प्रकार शुक्रवार(दि.07 मार्च) रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडला.
चक्रेश्वरवाडी येथील साताबाई वांगणेकर या आपल्या मुला सोबत राधानगरी येथे नातेवाईकांच्याकडे गेल्या होत्या.त्या परत येत असताना खिंडी व्हरवडे येथील ग्रामपंचायत येथे आणाजेहुन येत असलेल्या मोटारसायकल स्वारांनी त्यांच्या मोटारसायकलला पाठी मागून जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी होऊन खाली पडल्याने त्यांना उपचारासाठी 108 या रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.