प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
दरोडा टाकुन चोरलेले 1 कोटी 50 लाख रूपये सांगली मधुन हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा, रायगड ची दमदार कामगिरी.दिनांक 08/02/2025 रोजी इसम नामे श्री. नामदेव ईश्वर हुलगे वय-35 वर्ष, रा. सचिन चलफे बिल्डींग, 2 रा माळा, भोसले शाळा जवळ, महल, नागपुर यांनी पोयनाड पोलीस ठाणे येथे समक्ष हजर राहुन फिर्यादी दिली की, त्यांचे नागपुर येथे ज्वेलर्सचे दुकान आहे गेले 15 दिवसांपुर्वी इसम नामे समाधान पिंजारी याने संपर्क साधुन त्याचा मित्र नामे शंकर काळे याचेकडे 7 किलो सोने आहे ते 5 कोटीला स्वस्त दराने देतो असे आमिष दाखवुन अलिबाग येथे बोलावले. दिनांक 04/02/2025 रोजी ते व त्यांचे सहकारी ओमकार वाक्षे, नितीन पिंजारी असे 1 कोटी 50 लाख रूपये घेवुन प्रथम कामोठे येथे आले तेथुन समाधान पिंजारी हा अलिबागकडे पैशासह तिघांना ही घेवुन आला, पळस्पे याठिकाणी आल्यानंतर समाधान पिंजारी याचा सहकारी दिप गायकवाड हा इनोव्हा गाडी घेवुन आला होता. सदर गाडीमधुन अलिबागकडे येत असताना पोयनाड-अलिबाग रोडवरील तिनवीरा डॅमजवळ गाडी थांबली व दिप गायकवाड याने गाडी पेणच्या दिशेने वळवुन ठेवली त्याचवेळी 2 गणवेशातील पोलीस आले व त्यांनी त्यांना इथे का आलात? तुमच्याकडे गांजा आहे का? गाडीमध्ये काय आहे? असे दमदाटी करीत असतानाच समाधान पिंजारी याने त्या तिघांना गाडीतुन खाली उतरवले व दिप गायकवाड 1 कोटी 50 लाख घेवुन गाडीसह पेणकडे सुसाट निघुन गेला. त्यानंतर पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी अलिबाग पोलीस ठाणे याने त्यांचे मोबाईल बंद असल्याने जवळच्या नातेवाईकांना त्यांचा मोबाईल क्र. फोन करून तुम्ही अलिबाग पोलीस ठाणेला या नाही आले तर तुमचेवर 2 कोटीचा गुन्हा दाखल करू व वॉरन्ट काढुन अटक करू अशी धमकी दिली. अशा दिलेल्या फिर्यादीवरून पोयनाड पोलीस ठाणे मध्ये आरोपी नामे 1. समाधान पिंजारी, 2. दिप गायकवाड, 3. शंकर कुळे, 4. पोह/हनुमंत सूर्यवंशी अलिबाग पोलीस ठाणे, व गणवेशातील पोलीस अंमलदार यांचे विरूध्द पोयनाड पोलीस ठाणे कॉ.गु.रजि. नंबर 06/2025, भारतीय न्याय संहिता कलम 310(2), 351(2), 198, प्रमाणे दिनांक 08.02.2025 रोजी 00.44 वाजता दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत. सदर तपासादरम्यान आरोपी निष्पन्न करण्यात आले त्यामध्ये समाधान पिंजारी, दिप गायकवाड तसेच पोलीस अंमलदार विकी साबळे नेमणुक मुख्यालय, पोलीस अंमलदार समीर म्हात्रे नेमणुक मुरूड पोलीस ठाणे यांना दिनांक 08/02/2025 रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील आरोपी शंकर कुळे वसदर गुन्हयामधील अटक आरोपी नामे समाधान पिंजारी व दिप गायकवाड यांना दिनांक 08/02/2025 रोजी अटक केलेले असुन दिनांक 14/02/2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहेत. सदर आरोपीतांकडे दरोडा टाकुन चोरलेली 1 कोटी 50 लाख रूपये रक्कमेबाबत कसुन चौकशी केली त्यावेळी आरोपी नामे समाधान पिंजारी याने सदरचे संपुर्ण रक्कम दरोडा टाकल्यानंतर दिप गायकवाड याचे घरी ठेवली होती. त्यानंतर त्याने त्याचा चुलत भाउ नामे विशाल पिंजारी रा. आटपाडी जि.सांगली याला व अक्षय खोत रा.आटपाडी जि. सांगली यांना अक्षय खोत याची इको कार क्र. एमएच 10, इए-1126 ही घेवुन अलिबाग या ठिकाणी बोलाविले. ते दोघे दिनांक 06/02/2025 रोजी नमुद कार घेवुन अलिबाग याठिकाणी आले. सदर रक्कम तीन बॅगमध्ये होती. समाधान याने अलिबाग मधुन एक दुकानामधुन मोठी निळ्या रंगाची सुटकेस खरेदी केली. दिप गायकवाडच्या घरी ठेवलेली सर्व रक्कम तीन बॅगामधील काढुन खरेदी केलल्या सुटकेसमध्ये ठेवली. व सदर रक्कम अटक आरोपीत नामे विशाल पिंजारी व अक्षय खोत यांचे ताब्यात दिली. सदर दोन्ही आरोपीत नमुद रक्कम त्यांनी आणलेल्या कार क्र. एमएच 10, इए-1126 आटपाडी जि. सांगली येथे घेवुन जावुन लपवुन ठेवली आहे. अशी माहीती सांगितली. त्यावरून सपोनि भास्कर जाधव, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी व 3 अंमलदाराचे पथक तयार करून आरोपीत समाधान पिंजारी व पंचासह आटपाडी सांगली याठिकाणी जावुन विशाल पिंजारी व अक्षय खोत यांनी त्यांच्या ताब्यात ठेवलेले रोख रक्कम रूपये 1 कोटी 49 लाख 83 हजार हस्तगत करण्यात आले आहेत. सदरवेळी रक्कम लपवुन ठेवणारे विशाल पिंजारी व अक्षय खोत यांना ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे. तसेच त्यांनी रक्कम घेवुन जाण्यासाठी वापरलेली इको कार क्र. एमएच 10, इए-1126 जप्त केलेली आहे. तसेच अटक आरोपी समाधान पिंजारी व दिप गायकवाड यानी गुन्हयात वापरलेली इनोव्हा कार क्र. एमएच 06, बीई-3162 जप्त करण्यात आलेली आहे. तसेच अटक आरोपी पोलीस अंमलदार विकी साबळे व समीर म्हात्रे यांनी गुन्हयात वापरलेली पल्सर मोटारसायकल क्र. एमएच 06, बीटी 4143 जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, सहा. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उप निरीक्षक रूपेश नरे, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, सहा. फौजदार संदिप पाटील, सहा. फौजदार प्रसन्न जोशी, सहा. फौजदार राजा पाटील, सहा. फौजदार प्रसाद पाटील, पोह/यशवंत झेमसे, पोह/प्रतिक सावंत, पोह/अमोल हंबीर, पोह/सचिन शेलार, पोह/सचिन वावेकर, पोह/जितेंद्र चव्हाण, पोह/विकास खैरनार, पोह/परेश म्हात्रे, पोह/रवि मुढे, पोह/राकेश म्हात्रे, मपोह/अर्चना पाटील, पोह/अक्षय पाटील, पोशि/स्वामी गावंड, पोशि/ईश्वर लांबोटे यांनी केलेली आहे.
जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग