अतिग्रे येथे अंगणवाडीतील लहान चिमुकल्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

अतिग्रे प्रतिनिधी भरत शिंदे

     अतिग्रे तालुका हातकणंगले येथील अंगणवाडी क्रमांक 98, 99 ,,89, 279, 188, 190, असा एकूण सहा अंगणवाडीतील लहान चिमुकल्यांचा वार्षिक सन 2024 25 स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथमता प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यामार्फत श्रीफळ गुलाबपुष्प देऊन करण्यात आले जसा घराचा पाया महत्वाचा असतो त्याच पद्धतीने या लहान मुलांचे भवितव्य अंगणवाडी पासून शिक्षणात सुरुवात होते असे या अंगणवाडीतील लहान मुलांनी अत्यंत अशा पद्धतीने दिमागदार स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला त्यांना सर्व अंगणवाडी सेविकांचे व मदतनीस यांचे मार्गदर्शन लाभले 

   या कार्यक्रमास उपस्थिती प्रमुख मान्यवर अतिग्रे लोकनियुक्त सरपंच श्री सुशांत वडृ, उपसरपंच भगवान पाटील, माजी सरपंच श्रीधर पाटील, पांडुरंग पाटील, प्रशांत गुरव, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे ,अनिरुद्ध कांबळे, बाबासाहेब पाटील, नितीन पाटील, सदस्या अक्काताई शिंदे ,कलावती गुरव ,छाया पाटील ,दिपाली पाटील ,कल्पना पाटील ,वर्षा बिडकर तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील, पोलीस पाटील रूपाली पाटील, ग्राम विकास अधिकारी बाबासाहेब कापसे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम पाटील ,धनाजी पाटील, अमर पाटील ,पत्रकार भरत शिंदे, सर्व अंगणवाडी सेविका ,मदतनीस विद्यार्थी पालक , नागरिक मोठ्या संख्येने या लहान चिमुकल्यांचा कार्यक्रमाचा आनंद साजरा केला

Post a Comment

Previous Post Next Post