प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
डिजीटल मिडिया संपादक पञकार संघटनेचे सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी होणारे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार हातकणंगले येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.
यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के म्हणाले ,महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांसाठी ज्येष्ठ संपादक आणि माध्यमतज्ज्ञ राजा माने यांच्यारुपाने सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून नजिकच्या काळात डिजिटल मिडिया धोरण जाहीर होऊन डिजिटल माध्यमाला शासनमान्यता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डिजिटल मीडिया संपादक , पत्रकार संघटनेची हातकणंगले तालुका कार्यकारिणी निवडीसाठी हातकणंगले येथे आयोजित पत्रकारांच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी तालुका कार्यकारिणीसह इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. तालुकाध्यक्षपदी कीर्तिराज जाधव तर तालुका उपाध्यक्षपदी राजू म्हेत्रे कार्यरत असून तालुका सचिव म्हणून संभाजी चौगुले, संपर्कप्रमुख म्हणून विनोद शिंगे तर खजिनदार म्हणून उत्तम हुजरे यांना निवडपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून अनिल उपाध्ये यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सागर बाणदार यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रभर विस्तारली असल्याचे नमूद करुन श्री. फास्के यांनी ६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची सविस्तर माहिती दिली. डिजिटल मिडिया क्षेत्रातील संपादक पत्रकारांनी संघटनेचे सभासद होवून अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा संघटक अनिल उपाध्ये, तालुका संपर्कप्रमुख विनोद शिंगे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचा उहापोह करतानाच डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटित होण्याची गरज विषद केली. जिल्हा सचिव संजय सुतार, रसूल जमादार यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. इचलकरंजी शहराध्यक्ष सलीम संजापुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव यांनी केले तर उपाध्यक्ष राजू म्हेत्रे यांनी आभार मानले. या बैठकीस इचलकरंजी शहर उपाध्यक्ष विजय तोडकर, रामनाथ डेंगळे, राहुल पाटील,
रणधीर नवनाळे, बबन शिंदे, शहाहुसेन मुल्ला, निहाल ढालाईत, सुहास मुरतूले, मुबारक शेख, भरत शिंदे, किशोर जासूद, सचिन लोंढे, समीर पेंढारी, ओंकार बडवे, आप्पासाहेब भोसले यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.