बोपोडी उर्दू शाळेला मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांचे नाव देण्याच्या मागणीचे निवेदन देताना.. फिरोज मुल्ला (सर ) मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य (रिपाई (सचिन खरात गट )
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगर पालिकेच्या प्रत्येक शाळेला महान व्यक्तींचे नाव देण्यात आले आहे त्याच धरतीवर बोपोडी उर्दू मध्यमिक विद्यालयाला डॉ. ऐ. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे हे नाव देण्यामुळे उर्दू शाळेचे महत्व आजून वाढेल त्यांच्या नावामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणा मध्ये प्रेरणा आदर्श निर्माण होईल शिक्षण क्षेत्रात त्यांचे खूप मोठे योगदान आहे त्यांचे उतुंग कार्य देशाप्रती जनतेप्रती आणि विशेषतः लहान विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांचे प्रेम कार्य डोळ्यासमोर उभे राहील व त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल अशा महान व्यक्तीचे नाव देण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले.
यावेळी मतीनभाई मुजावर, चांदभाई बलबट्टी,राजन नायर, संदीपभाऊ शेंडगे, रफिकभाई शेख,जाहिदभाई, दोलाभाई पिरजादे, युसूफभाई बागवान, हाजी रोफभाई शेख, साजिदभाई शेख, फहीमभाई खान, इस्माईलभाई शेख, निजामभाई अन्सारी, साबुद्दीनभाई शेख, हलिमाअपा शेख, आदी मान्यवर उपस्थित होते