प्रेस मीडिया लाईव्ह:
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-कोल्हापूर शहरात जुना राजवाडा पोलीसांनी एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणात तिघांना अटक केली. त्यांच्याकडे तपास करीत असताना दिलेल्या माहितीनुसार यात सामील असलेल्या अन्य साथीदारांचा शोध चालू केला आहे. या एमडी ड्रग्ज विक्रीतून महिन्याला लाखो पेक्षा जास्त रुपयांची कमाई होत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. अटक महिलेच्या संपर्कातील आणखी एका महिलेचा पोलीस शोध घेत असून ती गोव्यातील असल्याचे समजते.
संशयीत अनिल संतराम नंदीवाले (वय ३१) आणि रोहित बसूराज व्हसमणी (२४, दोघे रा. माळवाडी, दोनवडे, ता. करवीर) यांनी एमडी ड्रग्ज विक्रीतून लाखां पेक्षा जास्त रक्कमेची कमाई केली. नंदीवाले याच्या तपासातुन अंमली पदार्थ खरेदी-विक्रीतील मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याचे स्पष्ट झाले.या गुन्ह्यातील महिलेसह गोव्यातील एडमंड परेरा यांच्या चौकशीतून या रॅकेटचा भांडाफोड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दोनवडे येथील अनिल नंदीवाले आणि रोहित व्होसमणी या दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणारी मुंबईतील मनीषा गवई आणि गोव्यातील एडमंड परेरा पोलिसांच्या हाती लागले. या चौघांच्या चौकशीतून ड्रग्ज आणि गांजा विक्रीतून झालेल्या आर्थिक उलाढालीची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.