प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांजाची विक्री करण्यास आलेल्या लुकमान अस्लम लमतुरे (वय 28.रा नाईक गल्ली,आजरा ) याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील 1 कि.100 ग्राम.वजनाचा गांजा आणि इतर असा 26 हजार 400 रु.किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर आजरा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हयांचा पुढ़ील तपास आजरा पोलिस करीत आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला अंमली पदार्थांचा साठा आणि त्याची विक्री करीत असलेल्यां गुन्हेंगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुशंगाने पोलिस रेकॉर्ड वरील गुन्हेंगारांची माहिती घेऊन तपास करीत असताना आजरा येथील भादवण येथे जुने एसटी बस स्थानका जवळ एक जण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे व पोलिस पथक यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून (दि.11) रोजी छापा टाकून ही कारवाई केली.