कोल्हापुर जिल्हयात जप्त केलेला 58 किलो गांजा पोलिसांनी केला नष्ट.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- महाराष्ट्र राज्यात 7 सूत्री कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मा.मुख्यमंत्री यांनी दिल्या होत्या.त्याचाच एक भाग म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने कोल्हापुर जिल्हयात गांजा हा अंमली पदार्थ बाबत विशेष मोहिम राबविण्यात आली.यात पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील  ठिकठिकाणी छापा टाकून 58 किलो गांजा हा अमली पदार्थ जप्त केला होता.तो जप्त केलेला गांजा न्यायालयाच्या परवानगीने पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे,गडहिग्लज/इंचलकरंजी विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील,पोलिस उपअधीक्षक श्रीमती सुवर्णा पत्की आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर याची नाश समिती स्थापन करून राजारामपुरी,कुरुंदवाड आणि पन्हाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ,फ़ॉरेन्सिक ल्यब विभाग यांच्यासह कोल्हापूर महानगरपालिका कडील आरोग्य निरीक्षक,वजन मापे अधिकारी व महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळ अधिकारी व दोन सरकारी पंचाच्या उपस्थित जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प क.बावडा. येथे जप्त केलेला 58 किलो.गांजा हा अंमली पदार्थ नष्ट करण्यात आला .

या वेळी पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस अशोक पोवार ,महेश गवळी,अरविंद पाटील,परशुराम गुजरे,नामदेव यादव ,वैभव पाटील,शिवानंद  मठपती आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post