प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे:- शिवसेना पक्षप्रमुख ,माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यावर चुकीचे आरोप केल्याबद्दल केल्यामुळे पुणे शहर शिवसेना महिला आघाडी च्या वतीने शिवसेना आणि ठाकरे परिवाराशी गद्दारी केलेल्या निलम गोर्हे यांच्या घरावर आक्रमक पणे निदर्शने व आंदोलन करताना महिलांनी महत्वाची मागणी केली की निलम गोर्हे माफी मागावी तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही तसेच स्वतःची इनोवा आमच्या गट नेत्याकडून घेतली आले. दोन वर्षानंतर त्यागाडीचे टायर आमच्या पदाधिकार्याकडून घेतलेले आहेत महिलांना कायम निलम गोर्हे यांना साड्या द्याव्या लागतात. शिंदे गटात पण विचारा निलम गोर्हे यांना साड्या द्याव्या लागतात की नाही. कायम मागणाऱ्याना कधी काही द्यायची सवय नाही आणि या काय मर्सीडीझ देणार. आणि महत्वाचे यांना चार वेळा आमदारकी दिली उपसभापती पद दिले. मग यांनी पाचवेळा मर्सीडीझ दिली असेल तर पावत्या दाखवाव्या. बेछूट आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेताल बडबड करू नये. शिंदे गटात कोणी विचारत नाही. पुढील आमदारकी मिळवण्यासाठी काहीतरी बोलले पाहिजे म्हणून बोलताय का ? असा सवाल महिलांनी विचारला. पोलिसांनी महिलांना गाडीत बसवून घेऊन गेले.
शिवसेना महिला आघाडी च्या वतीने रेखा कोंडे, रोहिणी कोल्हाळ, करूना घाडगे, सोनाली जुनावणे, पद्मा सोरटे, निकिता मराटकर, मंगल वाघमारे, गायत्री गरुड, विजया मोहिते , निर्मला वाघमारे, मीना वाघमारे, सीमा जगताप, रेखा कोळेकर, स्नेहल पाटोळे, युवा सेनेचे युवराज पारिख, गिरीश गायकवाड, रमेश परदेशी, आणि शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .