शिवजयंतीनिमित्त शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे पन्हाळा स्वच्छता मोहीम

 पन्हाळा येथे शिलेदार हायकर्स फौंडेशन तर्फे स्वच्छता मोहीम. पन्हाळा नगरपरिषदेच्या सहकार्यातून उपक्रम.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : शिवजयंतीचे औचित्य साधून कर्तव्यदक्ष  शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे गुरुवारी किल्ले पन्हाळा येथे स्वच्छता मोहीम राबविली.शिवछत्रपतींचा पन्हाळगडावरील दुर्लक्षित राजमहल, अंबरखाना, बालेकिल्ला, पुसाटी बुरुज, सज्जाकोटीसह अन्य परिसरात स्वच्छता मोहीम झाली. तीसहून अधिक पोती प्लास्टिक, कचरा गोळा, पन्हाळा नगरपरिषदेच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

सहभागी झालेल्या मावळ्यांना शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे टी शर्ट आणि प्रमाणपत्र दिले. शिलेदार हायकर्स फाउंडेशनचे संचालक नितीन पाटील, सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. या मोहीमेसाठी राजेंद्र साळोखे, उद्योगपती जयेश ओसवाल, चंदू माने-अण्णा माने स्पोटर्सचे सहकार्य लाभले. पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

शिलेदार हायकर्स फाउंडेशनचे ओंकार पावले, श्रीधर कांबळे, प्रथमेश पोवार, आदित्य पाटील, अभिषेक कांबळे, ओंकार घाटगे, स्वरुप मिठारी, सृजन पाटील, पार्थ यादव, प्रसाद कांबळे, आदित्य गुरव- पाटील, मुकुल कांबळे, यश पाटील, दिग्विजय भोसले, स्वरूप भोसले, अक्षय शिंदे, सौरभ सूर्यवंशी, राजू पाटील यांच्यासह पन्हाळा नगरपरिषदेचे शहर समन्वयक सुहास करळे. शंतनू सुतार, राजकुमार वाघपट्टे, करण कदम, अक्षय कासे, ऋषी पाटील सहभागी झाले. नगरपरिषदेतर्फे मोहीम यशस्वी केल्याबद्दल  फाउंडेशनला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सायकलपटू राम कारंडेचा सहभाग.

फिटनेस आयकॉन अक्षयकुमार फँन्स क्लब कोल्हापूरचे अध्यक्ष सायकलपटू राम कारंडे या मोहीमेत सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त ३९५ किमी सायकल परिक्रमा (३३ तासात) त्यांनी पूर्ण केली. शिवाजी विद्यापीठ येथून सुरवात करून नेसरी येथील प्रतापराव गुजर स्मारक ,किल्ले पारगड ,इचलकरंजी येथील शिवतीर्थ,पन्हाळागड अशी मोहीम केली. पन्हाळगडावर कारंडे शिलेदार हायकर्स फाउंडेशनच्या मोहीमेत सहभागी झाले. फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post