उर्दू शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनाला रिपाई (सचिन खरात गट) पक्षाचा जाहीर पाठींबा

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महानगर पालिका शिक्षण विभाग संचलित उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विविध समस्यावर दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी पुणे महानगर पालिकेवर लक्षवेधी आंदोलन शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मतीनभाई मुजावर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले रिपाई (सचिन खरात गट) पक्षाचे प्रदेश मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर ) यांनी जाहीर पाठींबा दिला उर्दू शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे शाळेची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे ती सुधरली पाहिजे शिक्षण हे कुठल्याही भाषेत असो ते मिळणे संविधानिक हक्क आहे आणि ते मिळालेच पाहिजे हे प्रलंबित प्रश्न मार्गी नाही लागले तर शिक्षण मंडळला टाळा ठोको आंदोलन करू असे फिरोज मुल्ला (सर )यांनी जनतेला संबोधित केले सर्व मान्यवरांनी आप आपली मनोगत व्यक्त केली 

या आंदोलनाचे नियोजन चांदभाई बलबट्टी यांनी केले यावेळी राजन नायर, संदीपभाऊ शेंडगे, रफिकभाई शेख, जाहिदभाई, दोलाभाई पिरजादे, युसूफभाई बागवान, हाजी रोफभाई शेख, साजिदभाई शेख, फहीमभाई खान, इस्माईलभाई शेख, निजामभाई अन्सारी, साबुद्दीनभाई शेख, हलिमाअपा शेख, आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post