प्रेस मीडिया लाईव्ह :
वारणा कोडोली : शाहूवाडी ता पिशवी या गावात पिसाई देवी मंदिरात तनिष्का व्यासपिठ आयोजित कुंकूमार्चन सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोडोली गावाच्या तनिष्का समन्वयक प्रा सौ प्रमोदिनी माने मॅडम व तनिष्का प्रतिनिधी सौ अनिता पाटील होत्या .
अत्यंत भक्तीमय वातावरणात श्री महालक्ष्मी स्त्रोत पठण माने मॅडम यांनी केल्या कुंकू मार्चन सोहळ्या नंतर देवीचि आरती करण्यात आली यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना माने मॅडम म्हणाल्या आध्यात्म हे क्षेत्र अमृतासारखे आहे जिवनाचा खरा अर्थ येथे समजतो नारी हे स्वःता शक्तीचे रुप आहे देवाला प्रतेक ठिकाणी पोचता येत नाही म्हणूनच नारी रुप प्रदान केले मातृत्व ही सर्वात मोठी ताकद आहे स्षी ही घराला कुंटूंबाना व समाजाला जोडणारी नाळ आहे त्यामुळे स्त्रीयांना स्वाताच्या सर्वागिण विकासाकडे लक्ष देने गरजेचे आहे समाजात वावरत असताना स्वःताला सावरन गरजेचे आहे त्यासाठी मोबाईल चा वापर जपून करने स्त्रीयांनी स्त्रीयां चा सन्मान करने गरजेचे आहे तनिष्का व्यासपिठामुळे महिलांचा विकास कसा होतो याचे सुंदर उदाहरण दिले जास्तीजासत महिलांना हे व्यासपिठ जॉईन करावे असे प्रतिपादन केले सौ अनिता पाटील मॅडम यांनी घरबसल्या व्यवसाय कसा करावा कोणते कोणते व्यवसाय कमी भांडवलात करू शकतो याचे मार्गदर्शन केले तनिष्का कॉडीनेटर सौ निलम देशमूख मॅडम यांनी प्रास्तवणा व पाहुण्याची ओळख करून दिली गटप्रमुख अश्विनी भरत अतिग्रे कार्यक्रमाचे नियोजन व पाहुण्याचे स्वागत केले आभार तनिष्का सदस्य अश्विनी जंचवंत पाटील यांनी मानले
कार्यकमास उपस्थित संगिता दळवी , राजश्री पाटील निता व्हनागडे , राणि दबडे, प्रज्ञा पाटील ,रेखा आंबर्डेकर , प्रणोती तोडकर , सविता खंडागळे , सुजाता पाटील , शितल मगदूम , हौसाबाई साळवी इ उपस्थीत होत्या .