प्रेस मीडिया लाईव्ह :
गेले दीड महिना टोमॅटोच्या शेतकऱ्यांकडून खरेदी दरात मोठी घसरण झाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी तोट्यात गेलेला आहे सविस्तर वृत्त-टोमॅटोची लावणी, तार, करावी लागणारी बांधणी, वातावरण बदलानुसार होणारे रोग टाळण्यासाठी औषध फवारणी, लागवड इत्यादीचा अमाप खर्च करून सुद्धा टोमॅटोची शेतकऱ्यांकडून खरेदी होते ते अत्यंत कमी दराने म्हणजेच साधारणपणे 5 ते 10 रुपये प्रति किलो दराने मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी होते .
मात्र तोच टोमॅटो सामान्य ग्राहकांना मात्र 30 ते 35 रुपये प्रति किलो दराने विक्री केला जातो. यामध्ये तुकाराम महाराजांचा वक्तीप्रमाणे पिकवूनी राजा उपाशी याप्रमाणे शेतकऱ्यांकडून मात्र कवडीमोल दराने मालाची खरेदी होतं. निगवे परिसरातील प्रभाकर पाटील, भास्कर पाटील, योगेश कांबळे या शेतकऱ्याने सांगितलेला होता नुसार प्रचंड प्रमाणात टोमॅटो साठी खर्च करून हाती मात्र काही लागत नसल्याचे त्यांनी सांगितले. लाल चिखल सारखी परिस्थिती झाली असल्याने भास्कर पाटील या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टोमॅटो गावकऱ्यांना फुकट वाटप केले . अशी आहे लाल टोमॅटो ची पाठीमागील काळी कहाणी..