खुनाच्या गुन्ह्याचा उलघडा करून त्यातील सर्व 11 आरोपींची नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपी व चार बालकांना बारा तासाच्या आत अटक.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
तळेगाव दाभाडे :- तळेगाव दाभाडे सरस्वती शाळेजवळ वराळे रोड येथे आर्यन बेडेकर यांचा सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लोखंडी कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला होता खून झाल्याने तळेगावात एकच खळबळ उडाली होती आता या खूनातील अकरा आरोपींचे नावे निष्पन्न झाले आहे त्यापैकी दोन आरोपी व चार बालकांना बारा तासाच्या आत पोलीसांनी अटक केली आहे.
वरिष्ठांच्या आदेशाने व सूचनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील गुन्हे शाखा युनिट 5 यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस हवालदार पवार, पोलीस हवालदार माने, पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस हवालदार मालसुरे पोलीस शिपाई खेडकर, पोलीस शिपाई इघारे, पोलीस शिपाई भोसले, पोलीस शिपाई गाडेकर, पोलीस शिपाई नांगरे असे कामगिरी केले आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 18/ 2025 भारतीय न्याय सं क 103(1) 61(2)
126(2)189(1) 189(2)189(4) 190, 191(3) भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4 ( 25) क्रि .लाॅ अमेन्टमेन्ट कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) अन्वये दाखल गुन्ह्याच्या समांतर तपास करत असताना सदर पथकाने गुन्ह्याचे घटनातील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे सदर गुन्हा हा अकरा आरोपींनी संगनमत करून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 5 कडील पथकाने सदर आरोपींच्या शोध घेऊन त्यापैकी आरोपी नामे शिवराज भागप्पा कोळी (वय वर्ष 20 रा. समता कॉलनी वराळे तालुका मावळ जिल्हा पुणे मुल राहणारा नागलसुर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर) तर अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथून सुरज लक्ष्मण निर्मळ (वय 22 वर्ष सध्या राहणारा मुंजोबा वसाहत चिंचवडे नगर वाल्हेकर वाडी मुळ रा. मुळूकवाडी तालुका जिल्हा बीड यास मुंजोबा वसाहत चिंचवडे नगर वाल्हेकर वाडी येथून अटक तर बालक नामे तीन बालक वय वर्ष 16 बालक वय 17, बालक वय 16 वर्ष यास राजाराम नगर साई चौका येथुन अटक करण्यात आले बालक वय 16 वर्ष पुणे स्टेशन बालक वय 17 यास राजाराम नगर साई चौका येथुन अटक सांगवी येथून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी नामे शिवराज कोळी, सुरज निर्मळ, बालक वय 16, बालक व 17, बालकवी 16, बालक वय 17 व इतर पाच आरोपी यांनी मिळून शिवराज भागप्पा कोळी यांचा भाऊ संतोष कोळी यास मयत नामे आर्यन बेडेकर यांनी त्यांचे साथीदारांना सोबत घेऊन मारहाण केले असल्याचा राग मनात धरून दिनांक 31/1/2025 रोजी सायंकाळी 5: 45 वाजेच्या सुमारास सरस्वती शाळे जवळ वराळे रोड तलेगाव दाभाडे येथे आर्यन बेडेकर यांचा लोखंडी कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला असल्याची कबुली दिली आहे आरोपी नामे शिवराज भागप्पा कोळी (वय वर्ष 20 राहणारा समता कॉलनी वराळे तालुका मावळ जिल्हा पुणे मुल राहणार नागलसुर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर) या अथर्व हॉस्पिटल मुलुख वाडी सुरज लक्ष्मण निर्मळ( वय 22 वर्ष सध्या राहणारा मुंजोबा वसाहत चिंचवडे नगर वाल्हेकरवाडी पुणे मूळ राहणारा मूळकवाडी तालुका जिल्हा बीड) बालक वय 17 बालक व 16 बालक वय 17 वर्ष यांना पुढील कारवाई कामे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले असून इतर आरोपीचा गुन्हे शाखा युनिट पाच कडून शोध सुरू आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहा पोलीस आयुक्त डॉ शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखाचे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा विशाल हिरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सूचनेप्रमाणे किशोर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवालदार पवार पोलीस हवालदार माने पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार मालसुरे पोलीस शिपाई खेडेकर पोलीस इघारे पोलीस शिपाई भोसले पोलीस शिपाई गाडेकर पोलीस शिपाई नांगरे यांनी केली आहे.