डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने 3 मार्चला रोजगार मेळावा

प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/प्रतिनिधी:

     डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे पंधराशे तरुणांना वेगवेगळ्या पदासाठी चांगल्या वेतनासह नोकरीची सुवर्णसंधी मिळणार असून जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले आहे.

      गणपतराव पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली व अन्य जिल्ह्यामधील युवकांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याची भूमिका श्री दत्त उद्योग समूहाने कायमच ठेवली आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत तीन रोजगार मिळावे घेण्यात आले असून या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय बाळगून फाउंडेशन मार्फत प्रत्येक वर्षी रोजगार मेळावा घेण्यात येतो. यावेळी सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड  (Quess corporation limited) या कंपनीसाठी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दत्तनगर, शिरोळ येथे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत हा रोजगार मेळावा होणार आहे. यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिग्री इलेक्ट्रिकल तसेच पदवीधर झालेल्या सुमारे पंधराशे तरुणांना वेगवेगळ्या पदांसाठी चांगल्या वेतनाच्या नोकरीची संधी मिळणार आहे. मुलाखतीसाठी येताना शैक्षणिक मूळ कागदपत्रांसहित उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Post a Comment

Previous Post Next Post