प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळः ता.13 : श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी दत्त उद्योग समुहाचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व.दिनकररावजी यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक , स्व.सा.रे.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ पाटील यांनी व स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजित पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील,निजामसो पाटील,अमर यादव,दरगु गावडे,सुरेश कांबळे,विजय सूर्यवंशी,प्रदीप बनगे,तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील , प्रॉडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, सिव्हील इंजिनिअर (प्रोजेक्ट) एल.पी.पाटील, सिव्हील इंजिनियर यशवंतराव माने, परचेस ऑफिसर व्ही.टी.माळी, सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे, स्टोअर्स किपर एस.व्ही.शिंदे,गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, ऊर्जाकुर मॅनेजर व्ही.आर.इंगळे,याचप्रमाणे कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, श्री दत्त भांडार या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.