टाकवडे येथे ऊस तोड महिलेचा पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू

 



प्रेस मीडिया लाईव्ह : 

हैदरअली मुजावर :

  टाकवडे येथे पाणी आणण्यासाठी विहीरीत उतरत असताना पाय घसरून विहीरीत पडून बुडून ऊसतोड मजूर महीलेचा मृत्यू झाला. लक्ष्मी अनिल चव्हाण (वय ३२, रा. पारधी, ता. जळगाव, जि. बीड) असे मृत मजूर महीलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मोहन कांबळे यांच्या गट नंबर १४३१ मधील विहीरीत ही घटना घडली. 

  घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दत्त साखर कारखाण्याल ऊस तोड करण्यासाठी बीड जिल्ह्यातील मजूरांचा तांडा येथील शरद कांबळे यांच्या शेतात वास्तव्यास आहेत. वस्तीपासून थोड्याच अंतरावर मोहन कांबळे यांची विहीर आहे. दिवसभर ऊसतोड करुन मजूर आपल्या खोपटावर आले होते. पिण्यासाठी पाणी नसल्याने लक्ष्मी या घागर घेवून विहीरीकडे गेल्या होत्या. पाणी भरून घेवून परतत असताना पाय घसरून विहीरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. 

  महीला विहीरीत बुडाल्याचे समजताच नातेवाईकांसह नागरीकांनी गर्दी केली होती. अंधार पडल्याने मृतदेह बाहेर काढण्यास अडथळा येत  होता. घटनास्थळी शिरोळ पोलिस आल्यानंतर विहीरीच्या तळाशी गेलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी कुरुंदवाड येथील दशरथ शिकलगार, शिवदत्त सोनार या पट्टीच्या पोहणार्यांना बोलावून घेत रात्री मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

  लक्ष्मी यांना दोन मुली व दोन मुले असून लहान मुलांचे मातृछत्र हरविल्याने घटनास्थळी नागरीकांतून हळहळ व्यक्त होत होते. अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post