प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली-मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केवळ दाखला देण्यात धन्यता न मानता समाजातील इतर प्रश्नांची सोडवणूक करून संघटना बळकट करावी असं प्रतिपादन मुस्लिम ओबीसीं संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी व्यक्त केले.
सांगलीत मुस्लिम ओबीसीं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.सद्या देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यानी इतर समाजाच्या बाधवांशी ऐकोप्याने राहावे आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्यांची मदत घ्यावी सांगत अन्सारी यांनी येणाऱ्या महापालिका,नगरपालिका जिल्हापरिषद निवडणुका ताकदीने लढवण्याची तयारी करावी असंही ते म्हणाले, यावेळी अमीन शेख,शाहीन शेख तसेच संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासीम मुल्ला यांनी मार्गदर्शन केले.गेल्या वर्षभरात झालेल्या कामकाजाचा आढावा प्रत्येक तालुका आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी सादर केला.त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येऊन त्यांचा सत्कार इकबाल अन्सारी यांच्या हस्ते झाला. अन्सारी यांनी शिक्षण,सरकारी कार्यलय,वैद्यकीय समस्यां यासह समाजाला भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा.त्यासाठी मार्गदर्शन शिबीरे घेण्याच्या सूचना केल्या.नोटरी म्हणून नियुक्ती झालेल्या एडवोकेट समीर शेख वसंतदादा साखर कारखान्याचे नूतन संचालक अंजुम महात,तायक्वांदो खेळाडू अक्सा मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला.संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासीम मुल्ला यांनी सांगली शहरात लवकरच कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची वाटचाल गतीने सुरू असल्याचे सांगितले.चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,मी मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्याशी संबंधित आहे.संघटनेच्या कार्यकर्त्याने कोणत्याही समस्येचा अभ्यास करावा,त्यामुळे सरकारी कार्यालयातील दररोज भेडसावणारे प्रश्न सोडवताना अडचणी येणार नाहीत दर तीन महिन्यांनी मार्गदर्शन शिबीर घ्या आपण विना मोबदला मार्गदर्शन करु असं मत व्यक्त केले.मुस्लिम
ओबीसीं संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांनी ओबीसींचे दाखले मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील शिवाय कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी सांगलीतील कार्यकर्त्यांची टीम ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्याना मदत करेल,समाजात संघटनेचे ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असं यावेळी बोलताना सांगितलं.प्रारंभी संघटनेचे राष्ट्रीय समनव्यक नासिर शरिककमसलत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकारी यानी आपल्या कार्याचा आढावा सादर केला.यावेळी जिल्हाउपाध्यक्ष युसुफ जमादार, ऐनुद्दीन मुजावर,सुहेल बलबंड यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी आणि मनपा शहर पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.