प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे: श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अध्यापक महाविद्यालय, अरणेश्वर, पुणे 09 च्या ग्रीन क्लबच्या वतीने "जल-अन्न सेवा: निसर्गमित्र अभियान" हे उपक्रम राबविण्यात आले. या अभियानांतर्गत महाविद्यालयाच्या मैदानावर पक्षांसाठी पाणी व धान्याची सोय करण्यात आली आहे.
वाढत्या उन्हाळ्यामुळे पक्षांना पाणी व अन्नाची कमतरता जाणवू लागल्याने महाविद्यालयातील ग्रीन क्लबच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरातून एक मूठ धान्य आणून महाविद्यालयाच्या मैदानावर ठेवले. पक्षांसाठी पाण्याच्या भांड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. चौगुले यांनी या अभियानाचे मार्गदर्शन केले, तर समन्वयक म्हणून प्रा. योगेश पाटील यांनी कार्यभार सांभाळला. कार्यक्रमास सर्व छात्राध्यापक व प्राध्यापक यांची उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण होऊन पक्षांच्या जीवनचक्रात मानवी योगदानाचे महत्त्व पटले. "