पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : प्रतिनिधी :
पुणे शहरात झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच संताप व्यक्त केला जात आहे. शिवशाही बसमध्ये झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली असून आरोपीची ओळख पटली आहे. पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी देखील पोहोचले आहे. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. आता या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा आता फोटो सुद्धा समोर आला आहे.
पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याच्या भावाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे पथक आरोपी दत्तात्रय गाडेच्या घरी दाखल झाले आहे. मात्र, तो घरी नसून फरार आहे. पुणे पोलिसांनी गाडे याच्या शिरुर येथील घरावर देखील छापा मारला आहे. गाडे याच्यावर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी आणि हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देखील त्याचा शोध घेत आहेत.
कोण आहे आरोपी?
दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. सध्या तो फरार आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचं पथक त्याच्या मागावर निघाले आहेत. त्याला लवकरच अटक करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील एक सुरक्षित बसस्थानक समजले जाते. तिथे 24 तास प्रवाशांची वर्दळ सुरू असते. त्यानंतरही तिथे ही घटना घडल्यामुळे महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. तो मूळचा शिरूरचा आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे नोंद आहेत. त्याने स्वारगेट बसस्थानकावर तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाहीमध्ये नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असला तरी स्वारगेट बसस्टँडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाच कशी कळली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतलं आहे. आरोपीचा तपास करण्यासाठी आरोपीचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात असून आठ टीमकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
.