प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सिंहगड रस्त्यावरील दाट लोकवस्तीच्या धायरी गावठाणातील खडक चौक रस्त्यावर ग्रामपंचायत काळात बसविण्यात आलेला गरडर वाहनांच्या धडका मुळे धोकादायक बनला आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता वाढली असल्याने पालिका प्रशासनाने गरडरची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी धायरी ग्रामस्थांनी केली आहे.
या बाबत सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाला आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, सनीभाऊ रायकर, निलेश दमिष्टे संदीप पोकळे संतोष चौधरी ,चिंतामणी पोकळे यांनी निवेदन दिले आहे
डबर खडी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे धायरी गावठाणातील मुख्य रस्त्यावर दररोज अपघात होत असल्याने निष्पाप नागरिकांचे बळी जात होते त्यामुळे ग्रामस्थांनी गावठाणात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यासाठी ग्रामपंचायत काळात वीस वर्षांपूर्वी लोखंडी गरडर बसविले होते.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, आज सकाळी पालीकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपची धडक बसून गरडर तुटून एका बाजूला पडला आहे. अगोदरच अरुंद रस्ता आहे त्यामुळे पादचाऱ्यांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे.